Saturday, December 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडलायन्सच्या शिबिरात १४१ जणांची नेत्र तपासणी, चष्मे वाटप 

लायन्सच्या शिबिरात १४१ जणांची नेत्र तपासणी, चष्मे वाटप 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४- डि-२, सुलभा उबाळे सोशल फौंडेशन, ज्येष्ठ नागरीक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी आणि नेत्रदान जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. Eye examination of 141 persons, distribution of spectacles in Lions camp  

यावेळी यमुनानगर येथील अपंग विद्यालयातील २२ विद्यार्थी, ११९ ज्येष्ठ नागरीकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर २२ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला तर २४ जणांना चष्मे वाटप केले. 

यावेळी डिस्ट्रिक्ट व्हिजनचे अध्यक्ष लायन्स क्लब इंटरनॅशनलचे हर्ष नायर, नेत्रदान प्रकल्प जिल्हाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, लायन्स क्लब निगडीच्या अध्यक्षा मिनांजली मोहिते, सचिव जयश्री मांडे, सीमा बांदेकर, दिलीपसिह मोहिते, रामकृष्ण मंत्री, सलीम शिकलगार, राजीव कुटे, फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलभा उबाळे, रामभाऊ उबाळे, राजु इंगवले, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष गजानन ढमाले, भरत डोके, भगवान श्रद्धे, शरद फलके, राजेंद्र घोडके, अंकुश जगदाळे, प्रदीप मुजुमदार आदी उपस्थित होते. तळेगांव जनरल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने लाभले.

संबंधित लेख

लोकप्रिय