Sunday, July 7, 2024
Homeताज्या बातम्याGroup Promoters : गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढत एल्गार!

Group Promoters : गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढत एल्गार!

मुंबई : गटप्रवर्तकांच्या (group promoters) मानधनात दहा हजार रुपये वाढ करा, संपकाळातील कपात केलेले मानधन द्या व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश करा, या मागण्यांचा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती च्या वतीने आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढण्यात आला.

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे ३५०० पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. दि.१४ मार्च२०२४ रोजी शासन निर्णय क्रमांकः आशा-५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७ या निर्गमीत केलेल्या जि.आर. मध्ये गटप्रवर्तकांना (group promoters) एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे. सुमारे पंचवीस हजार लोकसंख्येमध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षित गटप्रवर्तकांना अत्यल्प वाढ केल्यामुळे राज्यातील सर्व गटप्रवर्तक नाराज झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये गटप्रवर्तक गेल्या पंधरा वर्षापासुन काम करत आहेत.

संपादरम्यान आरोग्य मंत्री यांनी गटप्रवर्तकांना ६ हजार २००रुपये व मुख्यमंत्री यांच्या सुचनेनुसार त्यात रुपये ३ हजार ८०० ची आणखी भर घालुन दहा हजार रुपये मानधनात वाढ देण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करून शासनाने त्यांची चेष्टा केल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे पंचवीस आशा स्वंयसेविकांवर देखरेख करावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात महिन्याला २५ दिवस दौरे करुन आशांना भेटी देवुन त्यांना मार्गदर्शन करावे लागते. त्यांना मिळणारे मानधन हे त्यांच्या प्रवासावर खर्च होते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यातुन रक्कम शिल्लक राहत नाही. तेव्हा गटप्रवर्तकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दि.१६/०३/२०२४ रोजी कृति समितीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना भेटुन गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत निवेदन दिले आहे. अर्थमंत्र्यांनी गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीच्या जि.आर. मध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

गटप्रवर्तकांच्या (group promoters) मागण्या पुढीलप्रमाणे:

  1. दि.१४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय क्रमांकः आशा-५६२३/प्र.क्र.५३५/आरोग्य-७ या निर्गमीत केलेल्या जि.आर. मध्ये गटप्रवर्तकांना एक हजार रुपये एवढी अत्यल्प वाढ केलेली आहे.जि.आर. मध्ये दुरुस्ती करुन गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये वाढ करण्यात यावी. तसे आभ्यासन मा. अर्थमंत्री व आरोग्यमंत्री यांनी दिले आहे. त्यामुळे सुधारीत जि. आर. त्वरीत निर्गमित करुन तो माहे नोव्हेबर२०२३ पासुन लागु करा.
  2. गटप्रवर्तकांचे संप काळातील कपात केलेले मानधन त्वरीत द्या.
  3. गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचा-यामध्ये समावेश करुन त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ देण्यात यावे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन तो मंजुर करुन घेवुन गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये समावेश करा.
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात जोरदार आंदोलन, उपमुख्यमंत्र्याकडून कामाला स्थगिती

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय