Wednesday, May 22, 2024
Homeग्रामीणकेंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी दुंदा भालिंगे यांची निवड

केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी दुंदा भालिंगे यांची निवड

जुन्नर : जुन्नर तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी दुंदा भालिंगे यांची सर्वानुमते निवड झाली.यावेळी उपाध्यक्षपदी वामन शेळके यांची , कार्याध्यक्षपदी पुष्पलता पानसरे यांची आणि सरचिटणीसपदी सुरेश भवारी यांची एकमताने निवड करण्यात आली.

संघटनेच्या सल्लागार पदी माजी अध्यक्ष संजय जाधव आणि सतिश बोरकर यांची निवड करण्यात आली. दुंदा भालिंगे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंचायत समिती जुन्नरचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी डुंबरे, संचिता अभंग, धोंडगे, पवार, मंगल डुंबरे, आशा तितर, माधुरी शेलार, आंबेगावचे विस्तार अधिकारी गणपत रेंगडे , पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे, अखिल शिक्षक संघाचे सरचिटणीस तुकाराम हगवणे, एकल शिक्षक संघटना अध्यक्ष सुरेश देठे, डीसीपीएस संघटनेचे अध्यक्ष दिघे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव अशोक काकडे, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. दुंदा भालिंगे हे निमगिरी गावचे असुन खामगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय