Monday, October 28, 2024
Homeजिल्हाएकात्मिक बाल विकास सेवा योजना पालघर तर्फे पोषण पंधरवाडा उत्साहात सुरू !

एकात्मिक बाल विकास सेवा योजना पालघर तर्फे पोषण पंधरवाडा उत्साहात सुरू !

  पालघर :         दिनांक 21 मार्च 4 एप्रिल या कालावधीत प्रत्येक राज्यात पोषण पखवाडा याचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने सूचना दिल्यानुसार विभाग दांडी 2 मध्ये दिनांक 21 मार्च 27 मार्च या कालावधीत 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांची वजन व उंची घेऊन SAM व MAM बालकांचा शोध घेऊन अशा बालकांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्याचे नियोजन आहे तसेच दिनांक 28 मार्च ते 4 एप्रील 2022 या कालावधीत केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार व दिलेल्या नियमानुसार पोषण पखवाडा याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात पाण्याचे व्यवस्थापन ,ॲनीमीया मुक्त ,तसेच माता, मुले ,किशोरी मुली यांची हिमोग्लोबिन तपासणी, स्थानिक पारंपरिक आहाराचे महत्त्व, माता व मुलींसाठी पौष्टिक आहाराचे महत्व ,व ग्रहभेटीद्वारे समुपदेशन करून याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 

              पोषण पखवाडा या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 21 मार्च 2022 रोजी विभाग दांडी 2 अंगणवाडी सेवाश्रम येथे मा.श्री.अनिल रावते प.स.सदस्य यांच्यामार्फत करण्यात येवून प्रचार व प्रसिद्धी रथास हिरवा झेंडा दाखवून प्रचार प्रसिद्धी रथाचे ही उद्घाटन करण्यात आले. 

       सदर कार्यक्रमास श्री. कमलेश संखे ग्रामविकास अधिकारी बोईसर , दांडी- 2 विभागातील सर्व अंगणवाडी सेवीका , मदतनीस ,आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील नागरीक उपस्थीत होते .सर्व उपस्थितांना पंधरवड्याच्या अनुषंगाने सविस्तर प्रस्तावना केली .सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती कल्पना पिंपळे, यांनी केले .श्रीम शीतल पाटील यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना बालकांचे वजन उंची घेऊन पोषण ट्रॅकर ॲप मध्ये नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय