Friday, December 27, 2024
Homeराज्यशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केली महत्वाची घोषणा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केली महत्वाची घोषणा

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढ्या तयार करत असून विद्यार्थ्यांनी प्रश्नपेढ्या सोडवून परीक्षेची तयारी करावी, असं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याकडून प्रश्नपेढी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना या प्रश्नपेढ्यांचा वापर करण्यासाठी https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. विषय निहाय प्रश्नपेढ्या तयार होतील, तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संबंधीची माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय