पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक इन्स्पेक्टर शंकरराव पवार, सामाजिक कार्यकर्ते कैलाश गायकवाड हे प्रमुख पाहुणे होते.
रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अरविंद जाधव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रमेश रणदिवे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी प्राथमिक विद्यामंदिरातल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरुन उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकली. तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सामूहिक गीत सादर करून राष्ट्रीय एकात्मतेला प्रेरणा दिली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ.भीमराव पाटील, सुशीलकुमार गुजर, डॉ.बंडोपंत कांबळे,प्रा.प्रतिक्षा शिंदे,डॉ.तानाजी हातेकर,डॉ.देवकी राठोड, डॉ.प्रभंजन चव्हाण, डॉ.रेश्मा दिवेकर, डॉ.सविता पाटिल, प्रा.कुशल पाखले, डॉ.बद्रिनाथ ढाकणे, डॉ.राजेंद्र रासकर, मा.सखाराम शिंगाडे, डॉ.प्रभंजन चव्हाण, प्रा.संभाजी काकडे, प्रा.संतोष मोरे, प्रा.असावरी शेवाळे,प्रा.कल्याणी सोनावणे इत्यादींनी परिश्रम घेतले. तर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयाचे शाररिक संचालक डॉ.भीमराव पाटील यांनी सुत्रसंचालन केले.