Sunday, December 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआम्ही कोणाकडून तेल घ्यावे हे तुम्ही सांगू नका - भारताचा कडक इशारा

आम्ही कोणाकडून तेल घ्यावे हे तुम्ही सांगू नका – भारताचा कडक इशारा

नवी दिल्ली : युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियन तेल, नैसर्गिक वायूच्या व्यापारावर निर्बंध लादले आहेत. रशिया आणि भारत यांच्यामध्ये रुपया-रुबल विनिमयात कच्चे तेल देण्याचा करार मार्गी लागत आहे. यावर अमेरिका आणि युरोपातील देशांनी टीका सुरू केली होती. अमेरिका,युरोपने आता भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, युरोपमधील देश अद्याप रशियाकडून गॅस घेत असताना भारताला मात्र सल्ले दिले जात होते. भारतात स्वतःचे तेलसाठे नसल्यामुळे अशा कोणत्याही ऑफरचं स्वागतच केलं जाते. भारतीय उद्योजकही जागतिक बाजारात चांगल्या व्यवहाराच्या शोधात असतात, असे विधान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी केले. 

एमआयएमची महाविकास आघाडीला मोठी ऑफर, राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार?

भारताला स्पर्धात्मक ऊर्जा पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्ही सर्व उत्पादकांकडून अशा ऑफरचे स्वागत करतो,भारत जगातील प्रमुख तेल आयातदार देश आहे,रशिया आमचा पुरवठादार देश आहे. याआधी इराणवर अमेरिकेने निर्बध घातले होते. त्यामुळे इराण भारत तेल आयात थांबवण्यात आली होती.

युक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र अमेरिका आणि युरोपियन देशांना भारताची ही भूमिका पचनी पडत नाही. रशियाबरोबरचा तेल व्यवहार भारताला निश्चित फायदेशीर ठरणार आहे. भारताच्या या कडक भूमिकेमुळे येत्या काही दिवसात अमेरिकेत संताप निर्माण होऊ शकतो.

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडणार? किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमुळे खळबळ

रशियाचे 14000 सैनिक ठार युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला दावा !


संबंधित लेख

लोकप्रिय