Tuesday, July 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये नव्या 20 दगडी टेराकोटा सैनिकांचा साठा सापडला!

चीनमध्ये नव्या 20 दगडी टेराकोटा सैनिकांचा साठा सापडला!

 

बीजिंग : चीनमध्ये दिवंगत सम्राटाच्या मृत्यूपश्चात जीवनातील संरक्षणासाठी बनवलेले खर्‍या पुरुषाच्या आकाराच्या टेराकोटा सैनिकांचे पुतळे जगप्रसिद्ध आहेत. आता अशा आणखी 20 पुतळ्यांचा पुरातत्त्व संशोधकांनी शोध घेतला आहे.

इसवी सनापूर्वीच्या 259 ते 210 या काळातील किन शी हुआंग या सम्राटाच्या थडग्यापासून वायव्येस एक मैल अंतरावर तीन लांब खड्ड्यांमध्ये सुमारे 8 हजार सैनिकांचे पुतळे असल्याचे मानले जाते. त्यापैकी दोन हजार पुतळ्यांचा शोध लावण्यात आलेला आहे. टेराकोटापासून बनवलेले हे पुतळे हुबेहूब एखाद्या सैनिकासारखेच सुसज्ज होते आणि प्रत्येक सैनिकाचा चेहरा वेगळा होता हे विशेष!

आम्ही कोणाकडून तेल घ्यावे हे तुम्ही सांगू नका – भारताचा कडक इशारा

एमआयएमची महाविकास आघाडीला मोठी ऑफर, राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार?

सम्राट किन यानेच इसवी सनापूर्वी 221 या काळात चीनला एकसंध केले होते. दोन हजार वर्षांपूर्वीच्या या सम—ाटाची लोकप्रियता मोठी होती. इसवी सनापूर्वी 247 मध्ये किन राजा झाला व त्याने नंतर मोठीच प्रगती केली. 

आपल्या सर्व शत्रूंना पराभूत करून तो इसवी सन 221 मध्ये एकछत्री साम्राज्य़ाचा सम्राट बनला. इसवी सनापूर्वी 210 मध्ये या सम्राटाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपश्चात जीवनासाठी सहायक म्हणून असे सैनिकांचे पुतळे बनवून ते दफन करण्यात आल्याचे मानले जाते. आता तेथील क्रमांक 1 च्या खड्ड्यात आणखी वीस पुतळे आढळले आहेत. या खड्ड्यात युद्धसामग्री व रथांचा भरणा अधिक आहे. तेथील पुतळे हे सैन्यातील वरिष्ठ दर्जाच्या लोकांचे आहेत. त्यांची उंची शिरस्त्राणेही त्याची ग्वाही देतात.

हैद्राबाद येथील प्रगत संगणक विकास केंद्र येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय