Thursday, February 13, 2025

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडणार? किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमुळे खळबळ

Photo : Twitter @KiritSomaiya

मुंबई : महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये  सातत्याने आरोपप्रत्यारोप सुरू असतात. आज सकाळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे रिसॉर्ट पाडण्याबाबत ट्विट केल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट तोडण्या संदर्भात ट्विट करून तारीख जाहीर केली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं, “26 मार्च – चला दापोली…. अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”. मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्याने केला आहे. 

त्यामुळे आता पुन्हा सोमय्या यांच्या या ट्विटमुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles