भोकर (नांदेड) : इमारत व बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची जिल्हास्तरीय वार्षिक सभा भोकर येथील सीटू कार्यालयात दि.३१ मार्च रोजी संपन्न झाली. या वार्षिक सभेस सीटूचे राज्य महासचिव कॉ.ऍड.एम. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेमध्ये नवीन जिल्हा कमिटी निवडण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्ष पदी कॉ. कालिदास सोनुले तर सरचिटणीस पदी कॉ.दिलीप पोतरे, कोषाध्यक्ष कॉ.दिगांबर काळे, उपाध्यक्ष कॉ.जनार्धन काळे, फय्याज भाई मिस्त्री, सह सचिव पदी कॉ.यशवंत दळवे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे, सिटूच्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड आदींनी सभेस संबोधित केले. आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कॉ. शिवाजी गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. सभा यशस्वी करण्यासाठी कॉ.शेख चांद, कॉ.मारुती बोकवाड, सत्तार शेख आदींनी प्रयत्न केले.
