जुन्नर / रफिक शेख : आज दिनांक 23 जुलै रोजी जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना युडीआयडी कार्ड सहाय्यक गट विकास अधिकारी हेमंत गरीबे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी जुन्नर पंचायत समिती आरोग्य अधिकारी उमेश गोडे तसेच कक्ष अधिकारी रामचंद्र तळपे, समाज कल्याण विभागाचे योगेश जाधव, जुन्नर तालुका दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आरोग्य शाश्त्र विभागाचे आरती नगरकर, आस्थिया तांबोळी, मोणिका फडके यांच्या मार्फत दिव्यांग आरोग्य सेवा सर्वेक्षण एकूण 50 लाभार्थी घेण्यात आले.
या वेळी प्रहार जनशक्ती व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द महाराष्ट्र राज्य ग्रुप चे अध्यक्ष अरुण शेरकर, दत्तात्रय हिवरेकर, सुनिल जंगम, उपाध्यक्ष राहुल मुसळे, ओमकार शिंदे, सविता दुराफे, राष्ट्रवादी अपंग सेल च्या पुष्पा गोसावी, व मनसे अपंग संघटना चे महेंद्र फाफाळे, तबाजी आरोटे व दिव्यांग बांधव उपस्थित होते.