Friday, December 27, 2024
Homeसमाजकारणगिरिमानस व किसान सभेच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील ६० गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे...

गिरिमानस व किसान सभेच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील ६० गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

आंबेगाव (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील डिंभे व बोरघर येथील कातकरी वस्तीतील ६० गरीब व गरजू कुटुंबांना गिरीमनास व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब कष्टकरी २०० कुटुंबांना आतापर्यंत किराणा मालाचे किट किसान सभेच्या स्थानिक संयोजनातून वाटण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्यातील बोरघर व डिंभे येथील कातकरी वस्तीतील लोकांचे जीवन हे अत्यंत दयनीय व संघर्षमय असून कोरोनाच्या काळात त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन गिरीमानास व अखिल भारतीय किसान सभा या संघटनांच्या पुढाकाराने ६० कुटुंबांना जीवनावश्यक मालाचे किट्स वाटण्यात आले.                                                                                                  

यावेळी किसान सभेचे राजू घोडे, अशोक पेकारी, दत्ता गिरंगे, अविनाश गवारी विलास वळवे, विशाल भवारी सुभाष दगडे आदीसह उपस्थित होते. 

संबंधित लेख

लोकप्रिय