(नवी दिल्ली) :- देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक संक्रमित देश आहे. सध्या भारतात कोरोना बाधितांची संख्या 11 लाख 18 हजारांवर पोहोचली आहे, तर मृत्यू झालेल्यांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे. यातच आता एन-95 मास्क कोरोनाचा प्रसार रोखण्यात अयशस्वी असल्याची माहिती समोर आली आहे.
Director General of Health Services, Ministry of Health has written to all states and UTs stating, “the use of valved respirator N-95 masks is detrimental to the measures adopted for preventing spread of Coronavirus as it doesn’t prevent the virus from escaping out of the mask.” pic.twitter.com/TEA8BAqxzz
— ANI (@ANI) July 20, 2020
देशात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुद्धा तोंडाला मास्क लावण्याचे निर्बंध घातले आहेत. त्यातच कोरोनापासून बचावासाठी एन-95 हा मास्क सर्वात महत्वाचा मानला जातो. अशातच भारत सरकारचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून एन-95 मास्कचा वापर कोरोनाचा प्रसार रोखण्यात अयशस्वी असल्याचे म्हंटले आहे. कारण हे विषाणूला मास्कमधून बाहेर पडण्यापासून रोखत नाही. त्यामुळे कोरोनाचे आता नवीन आव्हान समोर येऊन ठाकले आहे.