राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, तब्बल ‘इतक्या’ रूपयांची वाढ
धनंजय मुंडे यांना अचानक किरकोळ त्रास जाणवू लागला. त्यानंतर मुंडेंना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडेना उपचारासाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील रूग्णालयात पोहोचले.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या एकून 740 जागांसाठी भरती !
राजेश टोपे यांनी रूग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची चौकशी केली व डॉक्टरांची देखील भेट घेतली. डॉक्टर धनंजय मुंडेंच्या प्रकृतीवर लक्ष्य ठेवून असून त्यांनी एमआरआय देखील केलं आहे. तर सध्या सर्व नॉर्मल असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, काळजी करण्याचे काही कारण नसून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तर कामाच्या तणावामुळे धनंजय मुंडे यांना अचानक त्रास झाला असू शकतो, अशी शक्यता राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे