Monday, December 23, 2024
Homeआंबेगावपुणे विद्यापीठात SFI व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीची निदर्शने 

पुणे विद्यापीठात SFI व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीची निदर्शने 

सोळंकी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी 

पुणे : आयआयटी मुंबईमधील दर्नश सोळंकी या १८ वर्षीय विद्यार्थ्याने जातीवादाला कंटाळून १२ फेब्रवारी रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दर्नश हा बीटेक प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरातील संस्थात्मक हत्यांच्या विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निदर्शन करण्यात आली.

गेल्या काही वर्षामध्ये देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये दलित, बहुजन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या नसून जाणूनबुजून घडून आणलेल्या हत्याच आहेत, असा आरोप करण्यात आला. रोहित वेमुला, पायल तडवी, दर्शन सोळंकी या सारखे असंख्य विद्यार्थी जातीवादाचा बळी ठरले आहेत. त्याचा विरोध व निषेध म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २२ फेब्रुवारी रोजी निदर्शन करण्यात आले. शैक्षणिक संस्थामध्ये जातीवाद होऊ नये यासाठी सरकारने रोहित अॅक्ट लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी SFI आणि कृती समितीच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste/ ॲन्हिलेशन ऑफ कास्ट) या ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात आले. हा ग्रंथ राहुल डंबाळे यांनी उपलब्ध करून दिला.

त्यावेळी यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, शहर अध्यक्ष अक्षय निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, प्रिया उदमले, प्रिया उगले, अस्मिता थावरे, मोसीन बनकर, हनुमंत शिंदे, कृती समितीचे राहुल ससाणे, सागर नाईक, ओम बोदले, शिवानी गित्ते, तुकाराम शिंदे, अनिक गायकवाड, युक्रांदचे कमलाकर शेटे, NSA चे हंसराज, अदिनाथ जावीर, श्रावणी बुवा, निहारीका आदी विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय