(बार्शी) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक २६ जून २०२० रोजी विजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिक्षक अभियंता, सोलापूर यांना कार्यकारी अभियंता बार्शी यांचे मार्फत हे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री यांना मेल करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, कोविड-१९ मुळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे, अशातच महावितरण कडून रिडिंग न घेता सरसकट आव्वाच्या सव्वा विजबिले पाठवली आहेत, कोरोना महामारीमुळे रोजगार नाही, याच काळत विजदरवाढ करून सर्व सामान्यांची लूट केली जात आहे त्यामुळे कोरोना महामारीच्या संकटच्या या काळात सर्वांची विजबिले माफ करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन प्रविण मस्तुद, अनिरूध्द नकाते, पवन आहिरे, बालाजी शितोळे यांंनी दिले आहे.