Friday, December 27, 2024
Homeजिल्हाकेंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, राज्यातील कर्मचाऱ्यांनाही विनाविलंब देण्याची मागणी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, राज्यातील कर्मचाऱ्यांनाही विनाविलंब देण्याची मागणी

तहसीलदार दापोली वैशाली पाटील यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

रत्नागिरी : केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ राज्यातही विनाविलंब देण्यात यावी, अशी मागणी सुशीलकुमार संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन सुशीलकुमार पावरा संस्थापक बिरसा फायटर्स यांनी तहसीलदार दापोली जिल्हा रत्नागिरी वैशाली पाटील यांना दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगानूसार केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यामध्ये 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानूसार केन्द्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना दिनांक 1 जानेवारी 2020 पासून 4%; दिनांक 1 जुलै 2020 पासून 3% तर दिनांक 1 जानेवारी 2021 पासून 4% अशी एकूण 11% महागाई वाढ दिली जाणार आहे. 

केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढी राज्यात देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र हा निर्णय उशीरा होत असल्याने, थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. जुलै ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील 5% दराने 5 महिन्यांची थकबाकी राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचा-यांमध्ये कमालीचा असंतोष आहे.

महागाई भत्त्याच्या थकबाकीमध्ये अधिक वाढ होऊ न देता, राज्यातील अधिकारी व कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना सदरची थकबाकी देण्याचा तसेच केन्द्राप्रमाणे 11% महागाई भत्ता वाढ देण्याचा निर्णय शासनाने विनाविलंब घ्यावा, अशी बिरसा फायटर्सची आग्रहाची मागणी आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय