Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहीणींना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही मीडिया रिपोर्टनुसार, 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांतील हप्ते, प्रत्येकी 1500 रुपये, अशा एकूण 7500 रुपयांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात याआधीच जमा करण्यात आली आहे. आता डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
सरकारकडून डिसेंबरचा हप्ता दोन टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे:
- पहिला टप्पा: सुमारे 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपयांची रक्कम जमा केली जाईल.
- दुसरा टप्पा: महिला व बाल कल्याण विभागाकडे आलेल्या उर्वरित 25 लाख अर्जांची पडताळणी करून या महिलांना हप्ता वितरित केला जाईल.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना दरमहा 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, यासंदर्भात निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाईल. त्यामुळे भविष्यात महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत एकूण 7500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याने राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिलांना 2100 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय अर्थसंकल्पादरम्यान होणार आहे. तोपर्यंत लाडक्या बहीणींना 1500 रुपयांचा हप्ता नियमितपणे मिळत राहील. महिलांना 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान
ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले
ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात
BMC : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा