Monday, April 14, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi : देहूतील इंद्रायणी नदीत मृत मासे ; इंद्रायणी नदी प्रदूषणात वाढ

ऑक्सिजन अभावी मासे तडफडून मेलेले आहेत

---Advertisement---

Alandi / अर्जुन मेदनकर : वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देहूतील पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असून देहूतील इंद्रायणी नदीत शेकडो मृत मासे आढळून आल्याने नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. रसायनयुक्त, मैला मिश्रित नदीच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मासे मृत झाले आहेत.

मृत माशांची विल्हेवाट वेळीच न लावल्यास ते सडून परिसरातील आरोग्य अजून बिघडण्याची शक्यता आहे, मृत मासे पाहून पर्यावरण प्रेमींनी नदी प्रदूषण रोखण्याकडे शासनाचे लक्ष वेधले असून वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देहूतील स्थानिक नागरिक आणि रानजाई प्रकल्प देहूचे प्रमुख सोमनाथ आबा मसूडगे यांनी दिला आहे.

---Advertisement---

येथील नदीत मृत मासे दिसल्याचे निदर्शनास आल्या नंतर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी आरती डोळस यांनी तात्काळ देहू नगरपंचायत मुख्याधिकारी नीलम घार्गे यांच्या समवेतभेट देऊन इंद्रायणी नदी प्रदूषणाचे रोखण्यासाठी उपाय योजना तसेच नदी प्रदूषित ठिकाणचे पाणी नमुने घेत या घटनेची दखल घेतली. यावेळी देहू नगरपंचायतीचे अभियंता संघपाल गायकवाड आदी उपस्थित होते. Alandi

मसूदगे यांनी येथील नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी केली. देहूतील काही ठिकाणचे पाणी थेट नदीत न सोडता, पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी मध्ये नेण्यासाठी योग्य त्या दक्षता घेण्याची मागणी केली आहे. जलप्रदूषण वाढले असून नदीत पाणी नसल्याने माश्याचे जीव गेले.यात विविध प्रकारच्या माशांचा समावेश आहे.

जीवित नदी संस्थेच्या शैलजा देशपांडे, श्री आळंदी धाम सेवा समितीचे (Alandi) अध्यक्ष राहुल चव्हाण यांचेसह विविध पर्यावरण प्रेमी व्यक्ती संस्था यांनी देहूतील इंद्रायणी नदी काठावर भेट देऊन पाहणी केली. 

देहूत कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडले जात असून दुषित पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे मेले आहेत.यामध्ये प्रदेशनिष्ठ आता दुर्मिळ झालेल्या महासीर माशांचाही समावेश आहे. पाण्यात तरंगणारे मेलेले मासे (पक्षी तोंड लावत नाहीत), किनाऱ्यावरचा मेलेल्या माशांचा खच, चाचणी करण्यास पाण्याचे नमुने घेतले आहेत. २७ मार्चला श्री संत तुकाराम बीज आहे. या पार्शवभूमीवर येथे मृत झालेले मासे आढळून आले असून भाविकांचे आरोग्याची काळजी घेऊन नदीचे प्रदूषण रोखण्यासह इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात वरून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

बीज सोहळ्यास लाखो भवित येत असून त्यापूर्वी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. नदीचं पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करीत असतात. नदीत देवमाशासारखे दुर्मिळ मासे देखील पाहण्यास मिळाले आहेत. माशांमध्ये देवमासे देखील मृत झाले आहेत. इंद्रायणी नदीत जलपर्णी वाढली आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जात आहे.  

कापूरवडा ओढ्यातून सांडपाणी नदीत जात असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. नायट्रोजनचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या मुळे माशांचा जीव जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आबा मसुडगे म्हणाले, सांडपाणी थेट नदीत जात आहे. जलपर्णी वाढली आहे. नदी प्रदूषण दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी कामकाज करण्याची गरज आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय

---Advertisement---

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles