Wednesday, February 12, 2025

Pragya Singh Thakur : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात वॉरंन्ट

Pragya Singh Thakur : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील महत्वाची बातमी समोर येत आहे. 2008 साली मालेगावात झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) विरोधात कोर्टाचं अटक वॉरंन्ट जारी केलं आहे.

मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात सोमवारी मालेगाव (Malegaon) 2008 बाँबस्फोट प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात कोर्टाने 10,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या प्रकरणातील आरोपी असून न्यायालयाच्या आदेशानंतरही त्या सुनावणीसाठी हजर झालेल्या नव्हत्या.

वकिलाने वैद्यकीय कारणास्तव सूट अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले, जे 20 मार्च रोजी परत करण्या योग्य आहे.

उत्तर महाराष्ट्रातील मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली शहरातील एका मशिदीजवळ बाँबस्फोट झाला होता. हा बाँबस्फोट दुचाकीतून करण्यात आला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित आहे तर बाँबस्फोटात वापरलेली दुचाकी ही प्रज्ञा ठाकूरच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणाचा तपास एटीएसकडून करण्यात आला होता. 2011 मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले. या खटल्यात 323 साक्षीदार झाले. त्यातील 34 जण उलटले होते.

दरम्यान, 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञा ठाकूरला जामीन मंजूर केला. 2019 साली त्या भाजपच्या तिकीटावर भोपाळच्या खासदार झाल्या. मात्र यंदाच्या 2024 च्या निवडणूकीत भाजपने प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट रद्द करत भोपाळचे माजी महापौर आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची शरद पवार यांनी केली घोषणा

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles