Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट:- आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

कोरोना अपडेट:- आज जिल्ह्यात इतक्या रुग्णांची झाली वाढ,वाचा सविस्तर

औरंगाबाद:- औरंगाबाद जिल्ह्यात आज १३७ जणांना  सुटी देण्यात आली. ज्यामध्ये मनपा हद्दीतील १०७ तर ग्रामीण भागातील ३० रुग्णांचा समावेश होता. आजपर्यंत ५६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३०० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.ज्यामध्ये मनपा हद्दीतील २४३ व ग्रामीण भागातील ५७ रुग्ण होते. तर सध्या जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७४४ इतकी झाली आहे. आजपर्यंत एकूण ३७७ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३७३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दुपारनंतर १७३ रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत ८१ पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवरील १६ आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६४, ग्रामीण भागात ०१ रुग्ण आढळलेले आहेत. सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण (९०)

जय नगर, बीड बायपास (१), शिवशंकर कॉलनी (१), एन बारा सिडको (१), भारत नगर, गारखेडा (१), सहारा पार्क (२), सारा  वैभव रोड (४), नारेगाव, पडेगाव (१), एन नऊ, श्रीकृष्ण नगर (३), मयूर पार्क (२), विठ्ठल नगर (१), राजे संभाजी कॉलनी, जाधववाडी (१), नक्षत्रवाडी (२),उस्मानपुरा (१), नागेश्वरवाडी (२), दौलताबाद टी पॉईंट (३), भवानी नगर (९), बालाजी नगर (१), विश्वभारती कॉलनी (१), भानुदास नगर (४),पद्मपुरा (३), प्रगती कॉलनी (२), न्याय नगर (४), जय भवानी नगर (१), हनुमान नगर (१२), काका चौक, पद्मपुरा (६), पहाडसिंगपुरा (३), चिकलठाणा (२), शांतीपुरा (३), वेदांत नगर (२), एन चार सिडको (२), सिडको (२), पन्नालाल नगर (१), बन्सीलाल नगर (१),केसरसिंगपुरा (१), छावणी परिसर (१), उस्मानपुरा (२), अन्य (१)

ग्रामीण भागातील रुग्ण (३)

साठे नगर, वाळूज (१), स्नेह नगर, कन्नड (१), वैजापूर (१)

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (१६)

बजाज नगर (१), वडगाव  (१), वाळूज (१), सिडको महानगर (१), पंढरपूर (१), छावणी (१), आंबेडकर नगर (१), शेंद्रा एमआयडीसी (१), टाकळी (२), द्वारका नगरी (१), भावसिंगपुरा (१), पडेगाव (२), पैठण (१)

नक्षत्रवाडी (१)

मोबाईल स्वॅब कलेक्शन (टास्क फोर्स) (६४)

पडेगाव (४), गुलमंडी (८), टीव्ही सेंटर (४), खोकडपुरा (५), एन चार (२), कैलास नगर (४), फायर ब्रिगेड (१), एन चार पारिजात नगर (१), रेल्वे स्टेशन परिसर (२), शिव नगर (९), सामना कार्यालय परिसर (१), छावणी परिसर (१), न्याय नगर (२२)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत शहरातील हडको कॉर्नर येथील ४२ वर्षीय स्त्री, फुलंब्री, बोरगाव येथील ६५ वर्षीय पुरूष, भावसिंगपुरा येथील ५६ वर्षीय स्त्री, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात (मिनी घाटी) बायजीपुऱ्यातील ५४ वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.      

संबंधित लेख

लोकप्रिय