औरंगाबाद, (दि.२६) : औरंगाबाद जिल्ह्यात आज ३७७ जणांना (मनपा ३१६, ग्रामीण ६१) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८५३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण १३० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग काहीसा मंदावला आहे असं दिसतंय. आज वाढलेल्या रुग्णांमुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३०३८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ४४३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ४०५९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर ८४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३७, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४४ आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (३७)
मयूर पार्क (४), वाळूज सिडको (२), सिडको महानगर (१), छावणी (१), शेंदूरवादा (१), अन्य (७), तीस ग्रीन स्कीम, पैठण रोड (२), रांजणगाव (४), बीड बायपास (२), बजाज नगर (१), सावंगी (४), सिल्लोड (२), देवळाई (१), शेंद्रा एमआयडीसी (३), एन नऊ प्रताप नगर (२)
मनपा हद्दीतील रुग्ण (३)
उस्मानपुरा (१), एन नऊ पवन नगर (१), एन दोन सिडको (१)
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू
घाटीत खुलताबादेतील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.