Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनापुणे विभागातील कोरोना बाधितांची संख्या 21 हजार 353 वर; वाचा सातारा, सांगली,...

पुणे विभागातील कोरोना बाधितांची संख्या 21 हजार 353 वर; वाचा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर यांची कोरोनाची आकडेवारी

    पुणे दि. 24 :- पुणे विभागातील 13 हजार 189  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 21 हजार 353 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 7 हजार 256 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.77 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

    यापैकी पुणे जिल्हयातील 17 हजार 274 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 10 हजार 288 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 365 आहे. कोरोनाबाधित एकूण 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 360 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.59 टक्के इतके आहे.

     कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 937 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 889, सातारा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 33 , सांगली जिल्ह्यात 02 तर कोल्हापूर जिल्ह्यात 07 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

      सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 850 रुग्ण असून 678 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

    सोलापूर जिल्हयातील 2 हजार 187 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 328 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 629 आहे. कोरोना बाधित एकूण 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 293 रुग्ण असून 192 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 92 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

     कोल्हापूर जिल्हयातील 749 कोरोना बाधीत रुग्ण असून 703 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 38 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

     आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 44 हजार 730 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 41 हजार 880 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 850 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 20 हजार 201 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 21 हजार 353 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  

              

संबंधित लेख

लोकप्रिय