मंचर : भोरवाडी ता. आंबेगाव येथील पुणे नाशिक रस्त्यावर शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी आठ वाजता कंटेनर पलटी झाला. त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल 5 तासानंतर कंटेनर बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यांत यश आले.
चाकण येथून नवीन कार घेऊन नाशिक मालेगाव येथे कंटेनर निघाला होता. भोरवाडी हद्दीत कंटेनर आला. त्यावेळी भोरवाडी हद्दीत पुलाजवळ भरधाव वेगाने कार जात असताना कार चालकाने स्पीड ब्रेकर पाहून ब्रेक दाबला असता मागून येणारा कंटेनर क्रमांक एच आर 47 सी 2318 आला. त्यावेळी समोरील कारला वाचण्याच्या प्रयत्नात कंटेनर उजवीकडे ओढल्याने कंटेनर जागेवर पलटी झाला. त्यामुळे नाशिक बाजू कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती.
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, हवालदार तुकाराम मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गवारी, कारभळ, हवालदार हेमंत मडके, जयवंत कोरडे, भीमा आहेर आणि पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाचे काम पाहिले. कंटेनर दुपारी रस्त्यावरून बाजूला घेण्यात यश आले. त्यानंतर पुणे नाशिक रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.