Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाSFI तर्फे तथागत गौतम बुद्ध व कार्ल मार्क्स यांची संयुक्त जयंती साजरी

SFI तर्फे तथागत गौतम बुद्ध व कार्ल मार्क्स यांची संयुक्त जयंती साजरी

औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समता संघर्ष प्रेरणा भूमी (Y-कॉर्नर) येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने तथागत गौतम बुद्ध व कार्ल मार्क्स यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्तावित कॉम्रेड विश्वजीत काळे यांनी केले. कॉम्रेड नितीन वावळे यांनी या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

वावळे म्हणाले, बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या काळात मोठे अंतर आहे मात्र दोघांच्या विचारात समान धागे आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय या विषयावरती बुद्धाच्या व कार्ल मार्क्स च्या विचारामध्ये साम्य दिसते. आज आपल्या पुढे असलेल्या समस्या रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार यांचा असलेला आभाव बुद्धांच्या व कार्ल मार्क्स च्या विचारातून भरून काढ़ता येईल ऐवढे सामर्थ्य या महामानवांच्या विचारार्थ आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यापीठ समितीचे अध्यक्ष अरुण मते यांनी केले. या प्रसंगी बोलतांनी त्यांनी ताथागत गौतम बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या विचारांची प्रासंगिकता सांगितली व महामानवांचे विचार समजून घेण्यासाठी पुस्तकांचे महत्व असल्याचे प्रतिपादन केले. कॉम्रेड प्रतिक शिंदे यांनी कार्यक्रमांचा समारोप बुद्ध कबीर भीमराव फुले हे गीत गाऊन केला. 

या कार्यक्रमास अनुजा सावरकर, प्रतिक बोर्डे, पवन मानवतकर, संदीप चव्हाण, कृष्णा जाधव,  प्रतिक शिंदे, प्रिती झोरे, वैशाली शिंदे, संघमित्रा गवळी,  प्रकाश वावळे, नोबेल हजारे, ज्ञमुनिर सय्यद, राजेश डोंगरदिवे, दिनेश भवाळे, शुभम गावई, कुणाल इंगळे, नितीन चव्हाण, प्रकाश खरसाडे, रणजित वायसे, साहिल शेख, अमरदीप अवचर इत्यादी उपस्थित होते.

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय