Monday, June 24, 2024
Homeताज्या बातम्याMLA P N Patil : काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

MLA P N Patil : काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

MLA P N Patil : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी राहत्या घरातल्या बाथरुममध्ये ते पाय घसरुन पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील (MLA P N Patil) यांची प्राणज्योत मालवली.

पी. एन. पाटील हे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष होते, तसेच करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणून आमदार पी एन पाटील यांची ओळख होती. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली. कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झंझावाती प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.

पी. एन. पाटील रविवारी सकाळी साडे आठ सुमारास राहत्या घरी बाथरुममध्ये पाय घसरुन पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आलं. ज्यामुळे पाटील यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं लक्षात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

MLA P N Patil

दरम्यान, जिल्हा काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज (23 मे) सकाळी 10 वाजता आमदार पी. एन. पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांचे पार्थिव मुळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येणार आहे. सडोली खालसामध्येच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय