दिंडोरी : नाशिक जिल्ह्यातील सन २०१९ मधील राज्य शासनाने जाहीर केलेले नुकसान भरपाई रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष बागा, भाजीपाला, पिकांचे नुकसान झाले होते. याचे पंचनामा करून राज्य सरकारने मदत जिल्ह्याला पाठवली. व तालुक्यांना वितरित केले आहे. मात्र ग्रामपंचायत आचारसंहिता व आता कोरोना संकटामुळे मदत अद्याप वितरित झाले नाही.
दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी ह्या मदत अनुदान पासून वंचित आहेत. आज शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे. तरी यावरती त्वरित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी किसान सभा व शेतमजूर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, एकनाथ दौंड, भास्कर शिंदे, विजय दराडे, देविदास भोपळे, नामदेव बोराडे, समीर शिंदे आदी उपस्थित होते.