Sunday, September 8, 2024
Homeआंतरराष्ट्रीयCNG दरात पुन्हा एकदा ; दरवाढ ही आहे नवी किंमत !

CNG दरात पुन्हा एकदा ; दरवाढ ही आहे नवी किंमत !

दिल्ली:  CNGच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने केलेल्या वाढीनंतर सीएनजीची किंमत आता दिल्लीत 73.61 रुपये प्रति किलो, नोएडामध्ये 76.16 रुपये आणि गुरुग्राममध्ये 81.94 रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने देशाच्या इतर भागातही सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. हरियाणाच्या रेवाडीमध्ये CNG 84.07 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्याच वेळी, कर्नाल आणि कैथलमध्ये 82.27 रुपये प्रति किलो; कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये सीएनजीची किंमत 85.40 रुपये प्रति किलो आणि अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये 83.88 रुपये प्रति किलो झाली आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गॅसच्या किमती वाढू लागल्यापासून सिटी गॅस वितरक वेळोवेळी दर वाढवत आहेत. दर दुसरीकडे याआधी 14 एप्रिल रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 एप्रिल रोजी दिल्लीत सीएनजीची किंमत प्रति किलो 69.11 रुपयांवरून 71.61 रुपये प्रति किलो झाली होती.

संबंधित लेख

लोकप्रिय