Saturday, June 29, 2024
Homeताज्या बातम्याPune : पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

Pune : पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

Pune : विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये २८ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पतीला पोलिसांनी बेड्या टाकल्या असून कुलुपाची चावी शोधली जात आहे. (Pune)

धक्कादायक बाब म्हणजे घटनेला 24 तास उलटून गेले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नाहीय. त्यामुळे अतीव वेदनेने पीडित महिला अजूनही विव्हळत आहे. जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गंभीर दखल घेत संबधित पती विरुद्ध भादवी 326, 506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसी पेशात काम करत असताना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एव्हढा विकृत गुन्हेगार कधीही पाहिला नसल्याचे सांगत पोलिसांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषी आढळनाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणातील पीडित महिलेच्या गुप्तांगावरील कुलपाच्या कड्या कापून ते काढण्यात आले असून पीडित महिलेवर उपचार करण्यात आले आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. 11 मे रोजी घटना घडली होती अशी देखील माहिती समोर आली आहे, त्या दिवशी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं ,मात्र दोन दिवस पीडित महिलेच्या गुप्तांगावर कुलूप तशाच स्थितीत लावलेलं होतं, कारण त्या कुलपाची चावी सापडत नव्हती आणि जखम सुजल्याने ते कुलूप काढणे अशक्य होतं. (Pune)

डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा प्रयत्न केला मात्र जखम आणखी चिघळण्याच्या भीतीने सर्जरी करणे देखील शक्य नसल्याने शेवटी जखमेवरील सूज उतरल्यानंतर कुलपाच्या दोन्ही कड्या कापून ते कुलूप काढण्यात आलं. या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी देखील अटक केला आहे. मात्र पतीने केलेलं कृत्य अत्यंत निंदनीय आणि चीड आणणारे आहे. अशा नराधम विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्याचे दोन्ही हात कलम केले जातील एव्हढी कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिलांच्या हक्क आणि सुरक्षेसाठी लढणाऱ्या दुर्गा ब्रिगेडया सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी या प्रकरणी पीडित महिलेला योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला

शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय