Thursday, December 26, 2024
Homeराज्यसिटी बस : पाच लाखांहून जास्त लोकसंख्येच्या 111 शहरांत येणार 20 हजार...

सिटी बस : पाच लाखांहून जास्त लोकसंख्येच्या 111 शहरांत येणार 20 हजार बस

अर्बन ग्रीन मोबिलिटीअंतर्गत या बस सीएनजी इंधनाच्या असतील

नवी दिल्ली : देशात ५ लाख लोकसंख्या असलेली शहरे व राज्य राजधान्यांसह १११ शहरांत २० हजार नवीन बस चालवल्या जाणार आहेत

वाहतुकीला दिलासादायक करण्यासाठी सिटी बसची संख्या आणखी वाढवली जाणार आहे. देशात ५ लाख लोकसंख्या असलेली शहरे व राज्य राजधान्यांसह १११ शहरांत २० हजार नवीन बस चालवल्या जाणार आहेत. अर्बन ग्रीन माेबिलिटी अंतर्गत या बस सीएनजी इंधनाच्या असतील. साेबतच केंद्र सरकारकडून संबंधित कंपनीला आर्थिक मदतही दिली जाणार आहे. हे काम पीपीपी माॅडेल अंतर्गत केले जाणार आहे. शहरांत बसचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी टाटा माेटर्स, अशाेक लेलँड, व्हाॅल्वाे इत्यादी कंपन्यांशी देखील सरकारने चर्चा केली आहे.

आगामी दाेन महिन्यांत याेजना जाहीर हाेणार आहे. शहरांना सगळ्या बस दाेन-तीन वर्षांत मिळतील. इझ आॅफ लिव्हिंग या उद्देशाने याेजना आणली जाणार आहे, असे गृह व शहरी कार्य विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आम्ही ग्रीन अर्बन माेबिलिटीचा उद्देशही आहे. लाेकांनी पायी चालावे. सायकल चालवावी इत्यादी गाेष्टी महत्त्वाच्या आहेत. केंद्र सरकार ही याेजना राबवणाऱ्या कंपनीला आर्थिक मदत देणार आहे. सरकारने अशा प्रकारच्या योजनेला राबवून पर्यावरण संरक्षणासाठी देखील प्रयत्न सुरू केले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय