रस्तावरील खड्ड्याचे केले सामुहिक पूजन
पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : गेल्या सात वर्षांपासून अनेक मागण्या करुनही कात्रज कोंढवा रस्ता, इस्कॉन मंदिर ते येवलेवाडी रस्ता होत नाही. लाखो रुपये भरुन लोकांनी घरे घेतली पण ना रस्ता ,ना सुरळीत पाणी. त्यामुळे थ्री ज्वेल्स सोसायटी व परिसरातील लोकांनी आज सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून आराध्यम सोसायटीपर्यत पायी मुक निदर्शने केली .यावेळी आपल्या मागण्यांचे फलक हातात घेऊन मुक निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरकांनी रस्तावर पडलेल्या खड्ड्याचे सामुहिक पूजन केले .
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230604-WA0024-1024x768.jpg)
महापालिका कर जास्तीचा वसुल करते पण ना रस्ता, ना पाणी त्यामुळे या भगातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच या सोसायटीतील बऱ्याच लोकांकडून ४० टक्के कर जादा घेतला जातो. अशा अनेक मागण्या यावेळी सोसायटीतील नागरिक व्यक्त करीत होते. या आंन्दोलनात प्रताप पाटिल, पांडुरंग भोळे ,अमित पुंगालिया ,अविनाश हिंगमीरे ,अभिजीत शाह ,विनित अमृतकर ,सागर देशपांडे यासह सोसायटीतील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येंने सहभागी होते .