Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा शासनातर्फे विमा, अशी आहे रक्कम

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे.

---Advertisement---

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

PCMC पाणीबाणी : पवना धरण पडू लागले कोरडे, फक्त “इतकाच” पाणीसाठा शिल्लक

ढगांमध्ये कशी तयार होते प्राणघातक वीज, काय आहेत त्याची शास्त्रीय कारणे?

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत 125 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 416 पदांसाठी भरती

‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन’ ही योजना तुम्हाला माहित आहे का ?, ही माहिती तुम्हाला असायलाच हवी…

राज्यातील ‘या’ सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार

अश्वगंधा शेती : चांगल्या उत्पनासाठी अश्वगंधाची या पद्धतीने लागवड करा, लाखात उत्पन्न मिळेल

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles