पिंपरी चिंचवड – आकुर्डी सबडिव्हिजन क्रमांक ४५९५ अंतर्गत असलेले पेठ क्रमांक १८ महात्मा फुलेनगर येथील ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (PCMC)
मंगळवार दिनांक २० मे २०२५ रोजी दुपारी पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली रोड येथे सुद्धा मुसळधार पाऊस पडला. त्याचवेळी पेठ क्रमांक १८ महात्मा फुलेनगर येथील काही भागातील वीज गायब झाली.
परिसरातील अनेक वीज ग्राहक व सामाजिक कार्यकर्ते वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अनेकदा एक तर फोन बिझी किंवा स्विच ऑफ लागत होता. (PCMC)
शेवटी सकाळी दहाच्या दरम्यान शिवानंद चौगुले मारुती जाधव व काही कार्यकर्ते थरमॅक्स चौक येथील वितरण कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन देशपांडे मॅडम त्यांची भेट घेतली व त्यांनी लागलीच आश्वासन दिले की एका तासात लाईट येईल परंतु तसे काही झाले नाही.
संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा संपर्क करण्यात आला परंतु फोनवरून संपर्क होऊ शकला नाही.
मग पर्यायी व्यवस्था म्हणून विज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी PRO निशिकांत राऊत त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर वीज वितरण कंपनीतून तक्रार समजून घेतले, त्यानंतर काही वेळातच कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि अवघ्या सात मिनिटात वीजपुरवठा सुरळीत केले. (PCMC)
सदर ठिकाणी कोणताही मोठा तांत्रिक अडचण निर्माण झाले नव्हते फक्त डीओ गेला होता. जर वेळेतच त्यांनी तक्रारीची दखल घेतली असते तर नागरिकांना २६ तास विजेपासून वंचित राहावे लागले नसते.
या गोष्टीचा कार्यकर्त्याने वीज वितरण कंपनीचे अधिकारी देशपांडे मॅडम यांच्याकडे पत्र देऊन निषेध नोंदवला आपल्याच हलगर्जीपणामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे आपण आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास येत आहे त्याबद्दल आपण नागरिकांचे क्षमा मागून यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काही द्यावी अशा पद्धतीचे मागणे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यशवंत कन्हेरे व मारुती जाधव उपस्थित होते.
अनेकदा आपण वीज वितरण कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे बातम्या वाचतो त्या बातमी मागचं मागवा घेणे गरजेचे आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत वेळोवेळी तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहे तर महावितरण कर्मचाऱ्यांनी किमान वेळेमध्ये वीज वितरण सेवा सुरळीत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे माफक अपेक्षा करीत बेजबाबदार व कामचुकार कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानी कारवाई करावी असे मागणी केली आहे.
शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : असंवेदनशील वीज वितरण अधिकाऱ्यामुळे नागरिक २६ तास अंधारात
---Advertisement---
- Advertisement -