Saturday, April 13, 2024
Homeताज्या बातम्याराज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद तर अंबड तालुक्यात संचारबंदी

राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद तर अंबड तालुक्यात संचारबंदी

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या या आरोपानंतर जरांगेंनी मुंबईला सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवरच काही जिल्ह्यांमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यातील काही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद (Internet Service Closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

ही इंटरनेट सेवा तब्बल 10 तास बंद असणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यासोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर अंतरवाली सराटीत पुन्हा गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदी करण्यात आले आहे. तसेच,कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

ब्रेकिंग : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना, आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळ

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय