Thursday, April 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Chhatrapati Sambhajinagar: ऐन मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऐन मध्यरात्री पाण्यासाठी शेकडो विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या बंगल्याचे गेट तोडून बंगल्यासमोर रिकाम्या बादल्या घेऊन तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. Chhatrapati Sambhajinagar news

---Advertisement---

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या विद्यार्थीनींनी विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी ऐन मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात पाणीच उपलब्ध नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थीनींनी थेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला व तब्बल दोन तास रिकाम्या बादल्या घेऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थीनींनी विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला.

प्रत्यक्ष कुलगुरू येऊन विद्यार्थिनिंशी चर्चा करत नाहीत आणि वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध केले जात नाही. तो पर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच चालूच राहील अशी आक्रमक भूमिका विद्यार्थीनींनी घेतल्यानंतर कुलगुरूंनी प्रत्यक्ष येऊन मुलींशी चर्चा केली व कर्मचाऱ्यांना वसतिगृहात तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. मुलींच्या वसतिगृहात पाणी आल्यानंतर या विद्यार्थीनींनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतले. Chhatrapati Sambhajinagar

---Advertisement---

या आंदोलनाचे नेतृत्व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या राज्य सचिव मंडळ सदस्य पल्लवी बोरडकर व SFI छ.संभाजीनगर जिल्हा समिती अध्यक्ष मनीषा बल्लाळ यांनी केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेशमोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चरतुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघातशिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेशमोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles