Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

“नरेंद्र मोदी सामान्य माणूस नाही, ते अवतार आहे”, स्वातंत्र्याबद्दलही काय म्हणाली कंगना रनौत

Kangana Ranaut On Narendra Modi : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. जनसभेला संबोधित करताना कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “सामान्य माणूस नसून एक अवतार” संबोधले. या विधानाने राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

---Advertisement---

कंगनाचे विधान नेमके काय? | Kangana Ranaut

कंगना म्हणाली, “नरेंद्र मोदी हे सामान्य नागरिक नाहीत, ते एक अवतार आहेत. 2014 पर्यंत मी स्वतः मतदानालाही जात नव्हते. मला राजकारणाबद्दल आणि नेत्यांबद्दल तिरस्कार होता. पण जेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले, तेव्हा त्यांनी देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीचेही राजकारणाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले आणि मी स्वतः या क्षेत्रात उतरले.” (हेही वाचा – महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप)

तिने पुढे सांगितले की, “आधीच्या काळात अनुच्छेद 370 च्या नावाखाली लूट माजली होती, तीन तलाकच्या नावाखाली मुस्लिम महिलांचे शोषण होत होते. पण मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने या गोष्टींवर मात केली.”

---Advertisement---

कंगनाने आपल्या भाषणात काँग्रेसवरही जोरदार टीका केली. ती म्हणाली, “काँग्रेसच्या काळात देशाला फक्त लूटले गेले. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी खूप मेहनत केली होती, पण खरी स्वातंत्र्याची भावना आणि प्रगती ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच दिसून आली.”  (हेही वाचा – मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका)

कंगनाचे हे विधान सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहे. काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. विरोधकांनी कंगनाच्या विधानावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेत्यांनी हे विधान “अंधभक्तीचे प्रतीक” असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी तिच्या या विधानाचे समर्थन केले आहे. (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)

ही पहिलीच वेळ नाही की कंगनाने अशा प्रकारचे विधान केले आहे. याआधी 2023 मध्ये तिने नरेंद्र मोदींची तुलना “कृष्णाचा अवतार” आणि “रामासारखे” अशी केली होती. तसेच, देशाच्या स्वातंत्र्याबाबतही तिने “1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले,” असे वादग्रस्त विधान केले होते.  (हेही वाचा – धक्कादायक : टार्गेट पूर्ण न केल्याने कामगारांना कुत्रा बनवले, प्रायव्हेट पार्टला स्पर्श व्हिडिओ व्हायरल)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles