पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – देशातील मध्यमवर्गीयांचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केला. (Budget 2025)
बारा लाख रुपये पर्यंत उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे, ग्रामीण भागाचा चेहरा बदलणारा आणि नागरिकांच्या गुंतवणुकीला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे.
त्याचबरोबर देशातील शेतकरी कष्टकरी व्यापारी उद्योग जग महिला युवक विद्यार्थी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचे संधी प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे.
Budget 2025
दाखले म्हणाले की, देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र कोणाच्या वाटेवर येणारा हा अर्थसंकल्प आहे असे मत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त करून या अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन व स्वागत केले आहे.