Sunday, April 13, 2025
---Advertisement---
---Advertisement---

1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या लाचखोर वरिष्ठ लिपिकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले

अमरावती : शिक्षण विभागातील लाचखोर वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या वरिष्ठ लिपिकास एसीबी ने पकडले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. विलास सोनुने (Vilas Sonune) (वय.52, नेमणूक – गोविंद विष्णू महाजन विद्यालय, मलकापूर, जि. बुलढाणा. रा. नंदनवन नगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे.

---Advertisement---

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भावाचा अनुकंप तत्वावरील नेमणूकीबाबतचा मान्यतेचा प्रस्ताव बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात मलकापूर शिक्षण समितीने सादर केला होता. सदर प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी आरोपी विलास सोनुने यांनी तक्रारदाराकडे 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रूपये लाच घेण्याचे ठरले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. त्यावेळी विलास सोनुने यांनी सरकारी पंचासमक्ष 1 लाख रूपये लाच म्हणून घेतले. यावेळी त्याला रंगेहाथ पकडले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक संजय चौधरी, पोलिस हवालदार विलास साखरे, पोलिस अंमलदार विनोद लोखंडे, मो. रिजवान, प्रविण बैरागी, महिला पोलिस अंमलदार स्वाती वाणी, पोलिस अंमलदार गौरव खत्री यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

शिंदेंच्या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी मागितली “ही” माहिती

राज्य मंत्रीमंडळाची बैठक संपन्न, झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मद्यपींसाठी खूशखबर : तर ड्राय डे कमी करणार… शंभूराज देसाई यांचे मोठे विधान

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles