Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयBreaking: व्हिडिओ :उत्तर प्रदेशात भीषण अपघात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळून 30 ठार

Breaking: व्हिडिओ :उत्तर प्रदेशात भीषण अपघात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळून 30 ठार

कासगंज :माघी पौर्णिमेनिमित्त ट्रॅक्टरमधून गंगा स्नानासाठी निघालेल्या  ट्रॅक्टरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भाविकांनी भरलेली ट्रॉली थेट तलावात पलटी झाली. या ट्रॅक्टर ट्रॉलीत 40 पेक्षा जास्त भाविक बसले होते. यातील 30 भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे.उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी हा अपघात झाल्याचे वृत्त प्रसारित झालेले आहे. मृत्यूमध्ये 13 महिला आणि दहा मुलांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेले आहेत,मृतांच्या नातेवाईकांना 6 लाख तर जखमींना 50 हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अजूनही बचावकार्य सुरु असून तलावाच्या दलदलीत काही भाविक अडकले आहेत का यादृष्टीने तपास सुरु आहे.

दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. तर घटनास्थळावरुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु असून, प्रशासनाने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय