औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज १२६ जणांना सुटी देण्यात आली. ज्यामध्ये मनपा हद्दीतील १०० व ग्रामीण भागातील २६ रुग्णांचा समावेश होता. आजपर्यंत ५३५५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण २५१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यामध्ये मनपा हद्दीतील ११७ व ग्रामीण भागातील १३४ कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९०६५ इतकी झाली आहे. आजपर्यंत एकूण ३६४ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३३४६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर ९३ रुग्णांची वाढ झाली आहे.
यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत ९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ३८ आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५५ रुग्ण आढळलेले आहेत.
सायंकाळनंतर आढळलेल्या या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण : (७३)
नेहरू नगर (४), भवानी नगर (४), मयूर नगर (१७), शिवाजी नगर (२), नक्षत्रवाडी (६), एसबीआय सिडको (३), अमृत साई प्लाजा (६), शांती निकेतन (९), समता नगर (७), औरंगाबाद (२), सादातनगर (१), टीव्ही सेंटर (१), एन तीन (२), एन तेरा (१), कांचनवाडी (५), इटखेडा (३)
ग्रामीण भागातील रुग्ण (२०)
कुंभेफळ (१), बाळापूर (२), सावंगी (२), सिडको महानगर (७), बजाज नगर (५), तिसगाव (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत औरंगपुऱ्यातील ६८ वर्षीय स्त्री, भाग्य नगरातील ७० वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.