Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाबेघर आदिवासींच्या न्यायासाठी बिरसा फायटर्स रस्त्यावर, उपोषण यशस्वी

बेघर आदिवासींच्या न्यायासाठी बिरसा फायटर्स रस्त्यावर, उपोषण यशस्वी

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रस्तापूर येथील बेघर झालेल्या 122 आदिवासी कुटुंबाना आधीची जमीन तातडीने मिळावी किंवा घरकुले व उपजिवीकेसाठी जमीन तातडीने मिळावी या मागणीसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या नेतृत्वाखाली 9 मार्च रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्यायग्रस्त 122 आदिवासी भिल्ल कुटुंबांनी आमरण उपोषण छेडले होते. सुशिलकुमार पावरा व आंदोलनकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी उपोषणाची दखल घेतली.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना तात्काळ लेखी पत्र देऊन मागण्यांबाबत कार्यवाहीसाठी कळविले आहे. तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पोलीस अधिक्षक अहमदनगर व तहसीलदार भूसूधार शाखा अहमदनगर यांनाही उचित कार्यवाहीसाठी तातडीने पत्र दिले. सदर लेखी पत्र आंदोलनकांना देऊन उपोषण मागे घेण्यास जिल्हाधिकारी अहमदनगर कडून विनंती करण्यात आली. त्यामुळे लेखी पत्र मिळाल्यामुळे आंदोलनकांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

 

आमरण उपोषणात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, पुणतांबा अध्यक्ष भिमा साळुंके, उपाध्यक्ष मच्छिंद्र रजपूत, दिपक माळी, विमलबाई रजपूत, रमेश सोनवणे, वसंत जगताप, भास्कर पवार आदिंसह 122 आदिवासी कुटुंबांतील महिला- पुरूषांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक संघटनांनी उपोषणाला पाठिंबाही दिला.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना तात्काळ लेखी पत्र देत आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यामुळे 100 पैकी 50% लढा यशस्वी झाल्याचे समाधान आंदोलकांनी व्यक्त केले. लेखी पत्रांचा योग्य पाठपुरावा करून लवकरच 100% यश मिळेल, अशी खात्री सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबांना लवकरच जमिन मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय