Tuesday, November 5, 2024
Homeराज्यजिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविणार, तर शाळांची तोडलेली वीज होणार पुर्ववत. वाचा...

जिल्हा परिषद शाळांना संगणक पुरविणार, तर शाळांची तोडलेली वीज होणार पुर्ववत. वाचा सविस्तर !

मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगकरिता संगणक देण्याबाबतचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यास संगणक उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

पालघरच्या जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग सुविधा मिळण्याबाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उशिरा प्राप्त झाला असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज जोडणी बंद केली असल्यास ग्रामविकास विभागाकडून वीज जोडणी पूर्ववत करण्यात येईल, असेही राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले.

याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य ॲड निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी विचारला होता.

महाराष्ट्रातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह ‘या’ ठिकाणी होणार !

अंगणवाडी सेविकांना अर्थसंकल्पातून मोठं गिफ्ट ? पगारात होणार ‘इतकी’ वाढ; बालसंगोपनाच्या निधीतही वाढ

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय