Thursday, September 19, 2024
Homeग्रामीणवडवणी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने नाभिक...

वडवणी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने नाभिक समाजाच्या वतीने तहसीलवर काढला निषेध मोर्चा

वडवणी (लहू खारगे) : केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरुन नाभिक समाजाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे यांच्या फोटोवरील अर्धी मिशी कापून वडवणी नाभिक समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर पायी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर वडवणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजकीय भाषणे देतांना बहुजन समाजाला उद्देशुन भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावनिच्या जहांगीर नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बहुजन समुहातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहिर माफी मागावी अन्यथा संपूर्ण राज्यातील नाभिक समाजासह बहुजन समाज आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडवणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी नाभिक समाज महामंडळाचे मराठवाड अध्यक्ष युवराज शिंदे, गुलाबराव राऊत, परमेश्वर राऊत, बबन भैरे, हनुमंत चव्हाण, आदर्श मोरे, वसंत बहिरे, संतोष काळे, विकास राऊत, माऊली राऊत, शरद चव्हाण, गोविंद झेंडे, विकास शिंदे, राहुल काळे, विकास शिंदे, रामेश्वर मंडलिक, परमेश्वर पंडित यांसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय