Monday, December 23, 2024
Homeनोकरीमोठी बातमी : उद्या शिक्षण व रोजगाराच्या मागण्यांसाठी विद्यार्थी - युवकांचे राज्यव्यापी...

मोठी बातमी : उद्या शिक्षण व रोजगाराच्या मागण्यांसाठी विद्यार्थी – युवकांचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : राज्यातील विद्यार्थी व युवकांच्या विविध मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 

राज्यभरात विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर याला प्रतिसाद मिळेल, असेही संघटनांनी म्हटले आहे.

■ SFI – DYFI आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1. आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी. तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागांवर 31 जुलै पर्यंत भरती झाली पाहिजे.

2. सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीएससीच्या माध्यमातून कराव्यात. शासकीय विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे. सरकारी विभागासाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेची खासगी एजन्सींना आऊटसोर्सिंग बंद करावी, कारण खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व अचूकता नसते.

3. विविध सरकारी विभागांमधील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात. भरती प्रक्रिया पुरेशा पारदर्शकतेने पूर्ण झाली पाहिजे.

4. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढून टाकणार्‍या खासगी शाळांचा परवाना सरकारने रद्द करावा.

5. खासगी शाळांमध्ये  50% फी कमी करावी. हे नोंद घेण्यासारखे आहे की, वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्यामुळे गेल्या वर्षी शाळांचा ऑपरेटिंग खर्च बराच घटला आहे.

7. आरटीई प्रवेश योग्य प्रकारे होत आहेत याची खातरजमा सरकारने केली पाहिजे.

8. आरटीई प्रवेशामुळे खासगी शाळांना फीच्या रकमेचा अनुशेष सरकारने तातडीने दिला पाहिजे.


संबंधित लेख

लोकप्रिय