Monday, October 28, 2024
Homeराष्ट्रीयटाटा स्टिल कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट

टाटा स्टिल कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट

झारखंड : झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टिल कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या घटनेत ३ मजूर जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 

शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान जमशेदपूर येथील टाटा स्टिलच्या प्लांटमध्ये स्फोट झाला. स्टोटानंतर प्लांटमध्ये गॅस लिकेज झाला. त्यामुळे आणखी आग भडकली. या घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोक प्लांटच्या बॅटरीमध्ये स्फोट झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कंत्राटावर काम करणारे 2 कर्मचारी जखमी झाले. स्फोट कसा झाला याचा शोध घेतला जात आहे.

महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ‘इतक्या’ वाढल्या

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली आहे. तसेच, टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने जिल्हा प्रशासन जखमींवर जलद उपचारासाठी कार्यवाही करत आहे, असे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

Sarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय