Friday, November 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBhosari Vidhan sabha 2024 : आमदार महेश लांडगे यांच्यामुळे दिघीची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढली...

Bhosari Vidhan sabha 2024 : आमदार महेश लांडगे यांच्यामुळे दिघीची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढली !

दिघीकर मतदार महेशदादांना भरभरून मते देतील (Bhosari Vidhan sabha 2024)

ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड यांची भावना

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – अनधिकृत बांधकामांवर लादलेला शास्तीकर सरसकट माफ केल्यामुळे आणि दिघी परिसराची पुणे, पिंपरी-चिंचवडशी ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवल्यामुळे विद्यमान आमदार तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे (MAHESH LANDGE) यांच्या पाठिशी दिघीकर मतदार ठामपणे राहतील आणि पुन्हा एकदा त्यांना विधानसभेत आमचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठवतील, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गायकवाड यांनी व्यक्त केला. (Bhosari Vidhan sabha 2024)

ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड हे दिघीतील ज्येष्ठ नेतृत्व त्यांनी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नगरसेवक व शहर शिवसेनाप्रमुख अशा अनेक पदांवर काम केले आहे. १९७५ पासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यामुळे दिघी परिसरात त्यांच्या नेतृत्वाची खूप मोठी छाप आहे. दत्तात्रय गायकवाड हे २००९ पासून महेशदादा लांडगे यांच्याबरोबर काम करत आहेत.

दत्तात्रय गायकवाड म्हणाले की, दिघीकारांचा जवळपास ४० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ झाला आहे. चक्रवाढ व्याज दराने लावलेला हा कर नागरिकांना खूपच त्रासदायक होता. त्यामुळे हा प्रश्न नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा बनला होता. महेश लांडगे यांनी हा शास्तीकर माफ करून दिघीकरांची मने जिंकले आहेत. हे दिघीतील मतदार याही विधानसभा निवडणुकीत महेशदादांना घवघवीत मतांनी विजयी करतील यात शंका नाही.

दिघीच्या विकासाला चालना मिळाली.

दिघी आणि समाविष्ट गावात जी विकास कामे केली विकास आराखड्यातले रस्ते तयार केले. पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. शाळा दवाखाने उभे केले यामुळे येथील नागरिक समाधानी झाले आहेत. संतपीठ, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, आयटी पार्क यामुळे मतदार संघात विकास झालाच. तसेच, रोजगार निर्मितीही झाली आहे. येथील स्थानिक भूमिपत्रांनी घरे बांधून येथे आलेल्या कष्टकरी श्रमिक वर्गाला वास्तव्याची सुविधा उपलब्ध करून दिले व त्यामुळे स्थानिक भूमिपत्रांनाही अर्थार्जन प्राप्त झाले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

प्रतिक्रिया :

दिघी परिसरामध्ये अनेक जागा या सीएमई व लष्करासाठी गेल्यामुळे येथे विकास कामांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. तरीही जेथे जेथे शक्य होईल तिथे पायाभूत सोयी-सुविधा सुविधा उपलब्ध करून देण्याचा महेशदादा लांडगे यांनी प्रयत्न केला आहे.

आळंदी- पुणे हा पालखी मार्ग दिघीमधून गेला आहे. त्याचे काम महेशदादांमुळेच पूर्ण झाले. येत्या विधानसभा निवडणुकीत दिघीकर मतदार निश्चितपणे आमदार महेशदादा लांडगे यांच्या सोबत असतील व दिघी परिसरातून मोठे मताधिक्य महेशदादांना प्राप्त होईल.

दत्तात्रय गायकवाड, ज्येष्ठ नेते, दिघी.

संबंधित लेख

लोकप्रिय