बार्शी : अखिल भारतीय किसान सभेचा तीन काळ्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले जत्था दि. 2 जानेवारी रोजी बार्शी मध्ये आला असता बधिर मूक विद्यालय येथे जोरदार स्वागत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
हा जत्था कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, बार्शी, परभणी, अकोला, अमरावती मार्गे हजारो शेतकऱ्यांना सोबत घेत नागपूर येथे किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड अतुल कुमार अंजन यांची येथे मोठी सभा घेऊन दिल्लीकडे जाणार आहे.
राज्यव्यापी जत्थाचे नेतृत्व करणारे अखिल भारतीय किसान सभेचे राज्यसचिव कॉ. नामदेव गावडे म्हणाले, “केंद्र सरकारने संमत केलेले तीन कृषी कायदे हे रद्द करूनच दिल्लीमधील आंदोलन थांबेल, कोरोनाचा फायदा घेत हे, राज्यसभेत विरोध होत असताना तीन कृषी कायदे सरकारने संमत केले, शेतीचे कंपनीकरण, कृषी उत्पन्न बाजार समिती, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था मोडून काढत शेती व शेतकऱ्यांना मोडून काढणे हा मुख्य उद्देश या कायद्यांचा आहे परंतु हा उद्देश शेतकरी सफल होऊ देणार नाहीत.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जत्थाचे स्वागत सर्व पक्षीय निमंत्रक प्रतिनिधी शिवसेना नेते दीपकभैय्या आंधळकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी भारतीय कम्युनिस्ट नेते कॉ. तानाजी ठोंबरे, अखिल भारतीय किसान सभेचे नेते लक्ष्मण घाडगे, तानाजी जगदाळे, बाळासाहेब जगदाळे, नाना बाराते, प्रवीण मस्तुद, दत्तात्रय जगदाळे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे ए. बी. कुलकर्णी, रशिद इनामदार, दत्तात्रय कदम, पांडुरंग यादव, दलित चळवळीचे नेते अजित कांबळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. हेमंत शिंदे, विनायक माळी, बांधकाम कामगार संघटनेचे अनिरुद्ध नखाते, शापीन शेख, बालाजी शितोळे, हॉस्पिटल संघटनेचे भारत भोसले, के.एन. मूळे, लहू आगलावे, घरेलू कामगार संघटनेचे शौकत शेख, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे पवन आहिरे, सौरभ शिंदे, अविराज चांदणे आदी उपस्थित होते.