Friday, May 3, 2024
Homeराजकारणसंजय राऊत यांना “ते” विधान भोवण्याची शक्यता, बार असोसिएशनकडून अवमान याचिका दाखल

संजय राऊत यांना “ते” विधान भोवण्याची शक्यता, बार असोसिएशनकडून अवमान याचिका दाखल

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपुर्वी न्यायव्यवस्थेवर केलेली टीका भोवण्याची शक्यता आहे. कारण राऊत यांच्या विरोधात बार असोसिएशनने अवमान याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाकडून भाजप नेते किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर तसेच भाजप नेत्यांना झुकतं माप दिलं जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होतं. मात्र संजय राऊत त्यांच्या या विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. इंडियन बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे, सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

न्यायालय किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांना झुकतं माप देत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर बार असोसिएशनने न्यायव्यवस्थेवर टीका-टीपण्णी करणे योग्य नाही तसेच संजय राऊत खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत बोलताना सांभाळून बोलावं, असं याचिकेत म्हटलं आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय