औरंगाबाद : गेल्या वर्षभरात इंधनाच्या वाढत्या किमती आणि इलेक्ट्रिक वाहनांविषयी केंद्र सरकारचे पोषक धोरण यामुळे अनेक वाहन उद्योग समूहांनी त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. देशभरातील ग्राहकांचा पुढील काळात इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढणार आहे, असे मार्केटिंग तज्ज्ञाचा अभ्यास आहे.
जागतिक इंधन उत्पादक देशामधील सतत बदलणाऱ्या किमतीमुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना सवलत देऊ शकणार नाहीत. त्यामुळे दुचाकी, कार खरेदी मागील वर्षभरात वाढली आहे.
ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
भारतात सर्वाधिक तीनचाकी वाहनांची निर्मिती करणारा बजाज उद्योग समूहाने औरंगाबादेत लवकरच तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्याच महिन्यात पुणे येथे असा एक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा बजाजने केली आहे.
गेल्या महिन्यात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून आकुर्डी पुणे येथे चेतक या इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीचा निर्णय झाला आणि आता औरंगाबादेत तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प सुरू करण्याचे ठरले. औरंगाबादेतील प्रकल्पात किती कोटींची गुंतवणूक असेल. रोजची निर्मितीक्षमता किती असेल, याचा तपशील लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता आहे.
नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !
१९८० च्या दशकात औरंगाबादेत बजाज उद्योग समूहाचे आगमन झाले. येथे प्रामुख्याने दुचाकी आणि रिक्षांचे उत्पादन सुरू झाले. बजाजला सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या अनेक छोट्या कंपन्या स्थापन झाल्या. त्यानंतर औद्योगिक जगताचे चित्रच बदलूून गेले. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. नव्या प्रकल्पामुळे पुन्हा प्रगतीचे वारे वाहतील, अशी आशा येथील उद्योजकांना आहे.
तीनचाकी वाहनांमध्ये बजाजची मक्तेदारी आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत महिंद्रा अँड महिंद्रा, पियाजो कंपनीने या क्षेत्रात धडक मारली आहे. लोहिया ऑटो कायनेटिक ग्रीन, अतुल ऑटो या कंपन्या बजाजच्या स्पर्धक आहेत.
हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते
टीव्हीएस कंपनीही याच दिशेने वाटचाल करत आहे. एकूण बाजारपेठेतील मागणी व गरज तसेच लोकांची रक्कम मोजण्याची क्षमता हे लक्षात घेऊन बजाज व्यवस्थापनाने औरंगाबादेत तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा नवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सूूत्रांनी सांगितले.