Monday, July 15, 2024
Homeजिल्हाकुडावडे आदिवासीवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

कुडावडे आदिवासीवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

दापोली : 14 जानेवारी मकरसंक्रात सणाच्या निमित्ताने कुडावडे आदिवासी वाडीत आदिवासी  बांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सालाबादप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या नियमांचे पालन करून कुडावडे आदिवासी वाडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी 11 वाजता पुजेचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी आदिवासी वाडीतील लोकांच्या विकासासाठी व चांगल्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. दुपारी 3 वाजता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यात अनेक महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून चांगल्या व सुखी  जीवनासाठी देवाकडे प्रार्थना केली व एकमेकांना तीळ गुळ देत “तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला” म्हणत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.  

विशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले

संध्याकाळी 6 वाजता आदिवासी समाजाला विशेष योगदान देणा-या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात समाजसेवक सुशिलकुमार पावरा यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गजानन सामाले व नितेश मोतेवार ह्या दोन्ही शिक्षकांचा सुद्धा विशेष सहकार्य करीत असल्याबद्धल सत्कार करण्यात आला. 

कुडावडे ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा पवार, मालती पवार, शिवाजी पवार, तटकरे, आदिवासी वाडी प्रमुख व प्रमुख व्यक्तींचा व  मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते

त्यानंतर आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा व क्रांतीकारक नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नृत्याच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आदिवासी नृत्ये, कोळी नृत्ये,अहिराणी नृत्ये, मराठी लावणी, हिंदी नृत्ये इत्यादी नृत्ये सादर करण्यात आली. आदिवासी राजा, मी आदिवासी राणी, आमू आदिवासी जंगल ना रखवाला,बायको तुनी नाची रायनी, दर्या किनारे एक बंगलो गं पोरी, ओ शेठ, निसर्ग राजा, गोरा गोरा नवरा पाहिजे, डीजे डान्स, बोले कंगना इत्यादी गाण्यांवर धम्माल नृत्ये आदिवासी वाडीतील मुले, मुली व तरूण, तरूणी व इतर कलाकारांनी सादर केली.

नृत्यांना प्रेषकांनी भरभरून प्रतिसाद दिला व पैशांच्या स्वरूपात बक्षीसे सुद्धा दिली. कार्यक्रमात आदिवासी राजा गाणे विशेष आकर्षण ठरले. बिरसा मुंडाची भूमिका बजावणारा बाल कलाकाराने प्रेषकांची मने जिंकली. आमू आदिवासी जंगल ना रखवाला या आदिवासी नृत्याद्वारे सुशिलकुमार पावरा यांनी सुद्धा प्रेषकांचे लक्ष वेधले.

विशेषओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशिलकुमार पावरा यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवाजी पवार यांनी केले. कार्यक्रमाला देणगी देणा-या व कार्यक्रमात सहयोग करणा-या सर्व बांधवांचे आदिवासी वाडीतर्फे आभार मानण्यात आले.

नोकरीची संधी ! नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय